Thursday, April 23, 2020

आरोग्यविमा घेताना माहिती लपवू नका

                कोणताही विमा हा ‘अटमोस्ट गुड फेथ’ अर्थात ‘अत्यंतिक विश्वास’ या तत्वावर बेतलेला असतो. म्हणजेच विमा उतरवणाऱ्या व्यक्तीने विमा कंपनीला विमा प्रस्तावासाठी सर्व आवश्यक माहिती देणे अपेक्षित असते. तुमच्या आरोग्य विमा कंपनीला तुम्ही कोणत्या टप्प्यावर आणि कोणती माहिती दिली पाहिजे, या विषयी...


वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबीयांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य विमा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच पुरेसे, विनाखंडित आरोग्य विमा कवच मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या विमा कंपनीला आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे.

➤विमा योजना घेताना

विमा उतरवण्यापूर्वी विमा कंपनीला प्रमाणिक प्रस्ताव देणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसारच कंपनी तुमच्यासाठी विमा योजना निश्चित करते. यामध्ये तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता या गोष्टींचा समावेश असतो. म्हणूनच विमा उतरवताना तुम्हाला आता असलेले आजारच नव्हे, तर पूर्वी झालेल्या आजारांची माहितीदेखील देणे महत्त्वाचे ठरते. विमा उतरवण्यापूर्वी तुम्ही किती तंदुरुस्त होता ही बाब विमा कंपन्यांसाठी निर्णायक ठरते. उदाहरणार्थ तुम्हाला विमा उतरवण्यापूर्वी तीन-चार वर्षांपासून काही आजार असेल, तर तो पूर्वीपासून असलेला आजार म्हणून गणला जातो. सामान्यतः विमा कंपन्या त्या आजारासाठी प्रतीक्षा कालावधी लागू करतात किंवा अतिरिक्त हप्ता आकारतात. त्यामुळे अशा कोणत्याही आजाराची माहिती लपवणे हे मूलभूत तथ्य लपवणे मानले जाते. त्यामुळे विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते आणि जेव्हा तुम्हाला विमा संरक्षणाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच तुम्हाला त्यापासून वंचित राहावे लागते.


➤प्रत्यक्ष दावा करताना
आरोग्य विम्याचा दावा दोन प्रकारे करता येतो..कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट (प्रतिपूर्ती). कॅशलेससाठी दाव्यामध्ये विमा कंपनी आणि संबंधित हॉस्पिटल एका नेटवर्कचा भाग असतात. त्याद्वारे संबंधित हॉस्पिटल विमाधारकाचे वैद्यकीय अहवाल आणि बिल संबंधित विमा कंपनीला पाठवते. यामध्ये विमाधारकाला फार काही करावे लागत नाही. प्रतिपूर्तीच्या दाव्यासाठी मात्र, विमाधारकाला दाव्याचा फॉर्म भरणे, त्यात वैद्यकीय उपचारांबाबतचे सर्व तपशील अचूक भरणे, विविध तपासण्यांचे मूळ अहवाल, मूळ बिले आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जोडून ती विमा कंपनीकडे सादर करावी लागतात. त्याआधारेच विम्याचा दावा मंजूर केला जातो. दावा करण्यापूर्वी आपल्या योजनेच्या अटींनुसार यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे आवश्यक ठरते. तुमचा आजार जुनाट असेल तर त्यासाठी प्रतीक्षा कालावधी लागू असू शकतो किंवा त्या आजाराला विमा संरक्षण लागू नसण्याचीही शक्यता असते.

➤नूतनीकरण करताना
वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च पाहता, दर वर्षी तुमच्या आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण करताना विमा संरक्षणाची रक्कम वाढवून घेणे आणि योजनेत समाविष्ट बाबींचा आढावा घेणे हितकारक ठरते. तसे करायचे झाल्यास कंपनीकडून तुम्ही केलेल्या दाव्यांची माहिती घेतली जाईल. नूतनीकरणावेळी तुमच्या आरोग्यविषयीची योग्य माहिती द्या, त्यामुळे पुढे दावा करायची वेळ आल्यास कोणतीही अडचण येणार नाही. नूतनीकरणापूर्वीच्या वर्षभरात तुम्हाला काही आजार झाला असेल आणि त्यासाठी तुम्ही दावा केला नसेल, तरीही त्याची माहिती विमा कंपनीला देणे ही तुमचीच जबाबदारी आहे. ही माहिती विमा कंपनीला तुमची विमा संरक्षण रक्कम निश्चित करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार तुमच्या विमा संरक्षणात बदल करण्यासाठी आवश्यक असते.

➤मोलाचा सल्ला:
मूलभूत आणि आवश्यक तथ्ये लपवल्यामुळे आरोग्य विमा संरक्षण रद्द झाल्यास दुःखी होण्यापेक्षा वेळीच सावध होऊन आरोग्याविषयीची खरी माहिती विमा कंपनीला देणे हिताचे ठरते. त्यासाठी विमा योजनेची माहिती बारकाईने वाचून त्यानुसार आवश्यक माहिती विमा कंपनीला द्यावी. त्यामुळे तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबीयांच्या आजारपणात स्वतःच्या खिशावर ताण येऊ न देता त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकता.


⧫⧫साभार : दैनिक महाराष्ट्र टाईम्स 
WhatsApp

आरोग्य विमा : आजारपणातील आर्थिक आधार

      गंभीर स्वरूपाच्या व्याधी जडल्या असताना विम्याचे संरक्षण खूपच कामी येते. त्यापैकीच एक ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ असलेली पॉलिसी म्हणजे रोगनिदान झाल्यानंतर एकरकमी मोठे साहाय्य विमा कंपनीकडून उपचारासाठी मिळवून देणारा उपाय आहे. यापूर्वी आयुर्विम्याकडे, केवळ मृत्युप्रसंगी संरक्षण म्हणजे आपल्या पश्चात कुटुंबासाठी आर्थिक तजवीज या अर्थाने बहुतांश पाहिले जात होते. परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यक उपचारातील प्रगतीमुळे बहुतांश दुर्धर आजारांतून आता पूर्ण बरे होता येणे शक्य बनले आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. परंतु वैद्यक विमा हा त्यावरील उतारा निश्चितच आहे आणि अगदी सामान्य पगारदार व्यक्तीसाठी महागडा वैद्यक उपचार आवाक्यात आणण्यास तो मदतकारक ठरला आहे.

➨क्रिटिकल इलनेस कव्हरचे महत्त्व
आपण आपल्या आसपास जरी पाहिले तरी ओळखीपाळखीत कुणी ना कुणी या आजारांचे बळी ठरल्याचे आढळून येईल. कर्करोग, हृदयविकार, महत्त्वाचे अवयव निकामी होणे वगैरे आजार गंभीर जरूर आहेत; पण दुर्धर निश्चितच राहिलेले नाहीत. अर्थात उपचाराचा कालावधी खूप मोठा तसेच वैद्यकीय व बिगर वैद्यकीयदेखील मोठ्या खर्चाचा भार पेलण्याच्या क्षमतेसाठी क्रिटिकल इलनेस कव्हर आवश्यक ठरतो. या पॉलिसीतून निश्चित केलेली हमी रक्कम (सम अॅशुअर्ड) रोगनिदानासरशी ताबडतोब दिली जाते. आधुनिक रुग्णालयांतून आवश्यक ते उपचार त्यामुळे घेता येणे शक्य बनते. परंतु पॉलिसीचे लाभ मिळवण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हायलाच हवे असेही नाही. या पॉलिसीतून मिळणारा पैसा रुग्णांना उपचाराचा खर्च, डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैली, आहार, पथ्ये पालनासाठी येणारा खर्च, भारतात अथवा विदेशांत पर्यायी औषधोपचारासाठी, अवयवदाते मिळवण्यासाठी येणारा खर्च आदींसाठी वापरात येऊ शकतो. सामान्य आयुर्विमा अथवा मेडिक्लेम पॉलिसीतील अधिकची भर अर्थात रायडर या स्वरूपात अथवा पूर्णपणे स्वतंत्र क्रिटिकल इलनेस कव्हर पॉलिसी घेता येते. दावे प्रक्रियेत दोन्ही प्रकारच्या पॉलिसीत कोणताही फरक नसतो. दोन्ही प्रकारच्या पॉलिसीत रोगनिदानानंतर मोठी रक्कम विमेदाराला मिळवता येते.

➨अटींकडे लक्ष द्या
क्रिटिकल इलनेस पॉलिसीसंदर्भात लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे, रोगनिदानासरशी मोठी रक्कम देताना काही जीवितविषयक शर्ती घातल्या गेल्या आहेत. बहुतांश विमा कंपन्यांनी पॉलिसीधारक दावा दाखल झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत जीवित असावा, अशी अट घातली आहे. या अशा शर्तीपायी, लोक रुग्णालयात भरती होण्याऐवजी उपचाराच्या वेगळ्या पद्धती आजमावून नंतर त्याचा मोबदला विमा कंपनीकडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु असा मागाहून मोबदला देणाऱ्या योजनांतही केवळ अॅलोपथी औषधोपचारावर झालेला खर्चच विशिष्ट अटींसह अदा केला जातो. अर्थात हा पर्यायही बहुतेकदा व्यवहार्य ठरणारा म्हणता येणार नाही. त्यामुळे क्रिटिकल इलनेस कव्हर घेताना पॉलिसीच्या अटी-शर्ती काळजीपूर्वक लक्षात घेण्याबरोबरच, विम्याची हमी रक्कम पुरेशी असावी हे पाहणेच अधिक महत्त्वाचे आहे.

➨आरोग्य विमा - महत्त्वाचे मुद्दे
आजारपण हे सांगून येत नसते, ते कधीही कोणत्याही वेळी आपल्यावर येऊन आदळत असते. म्हणूनच केवळ एखाद-दोन आजारांबाबत दक्षता बाळगण्याऐवजी अनेक गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत संरक्षण देणाऱ्या मल्टिपल इलनेस कव्हरला आपण प्राधान्य द्यावे. एकाच पॉलिसीतून संरक्षण मिळवीत असल्याने हप्ताही कमी राहील. क्रिटिकल इलनेस विमा संरक्षण जवळपास सर्वच आयुर्विमा व सामान्य विमा कंपन्यांकडून पुरवले जाते. मागाहून परतावा (रिएम्बर्समेंट) हा प्रकार सामान्य मेडिक्लेम पॉलिसीला लागू होतो. काही विमा कंपन्यांनी महिलांना जडणाऱ्या विशिष्ट गंभीर आजारांसाठी विशेष पॉलिसी आणल्या आहेत. या पॉलिसी चांगल्या असल्या तरी सामान्य व विशेष पॉलिसीतील हप्त्यांचा तुलनात्मक वेध अवश्य घेतला जावा. दोहोंपैकी कशाची निवड करावी हे त्या त्या ग्राहकांनुरूप ठरेल अथवा ठरवले जावे. आयुर्विमा व मेडिक्लेमव्यतिरिक्त गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत दक्षता म्हणून स्वतंत्र क्रिटिकल इलनेस पॉलिसीही घेणे नेहमीच चांगले ठरेल. कारण रोगनिदान झाल्याबरोबर, विमेदाराला मोठी रक्कम मिळून निर्धास्तपणे व चांगल्यातील चांगला उपचार घेता येतो. रुग्णालयात भरती न होताही आपल्या मनाजोगते अगदी परदेशात जाऊनही उपचार मिळवण्याचे स्वातंत्र्य अन्य कोणत्याही विमा संरक्षणातून मिळवता येत नाही.


  • साभार - दैनिक दिव्य मराठी 
WhatsApp

कार इन्शुरन्सचे प्रकार व इतर माहिती

विम्याचे प्रकार थर्ड पार्टी विमा
या प्रकारचा विमा हा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यातील तरतुदी वाहनाच्या नुकसानभरपाईसाठी नसून एखाद्या व्यक्तीस व त्याच्या वाहन अथवा मालमत्तेस वाहनामुळे नुकसान, इजा अथवा जीवितहानी झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी आहे. हा विमा न काढल्यास कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा ठरू शकतो.
साधारण सर्वसमावेशक विमा योजना
या प्रकारच्या विमा योजनेत अपघात वादळ, भूकंप, आग, पूर, दंगल यामुळे होणारे नुकसान गृहीत धरले जाते. पण गाडीचे टायर, बॅटरी, रबर प्लास्टिक भागांची (पॉलिसी काढल्या दिवसापासूनच) नुकसानभरपाई (५०% उत्पादकाने ठरवलेल्या एमआरपीच्या तुलनेत) मिळते. त्याचप्रमाणे धातू व पत्र्याच्या पार्ट्सवर पहिले सहा महिने घसारा शून्य टक्के असतो. परंतु आता यापेक्षाही अधिक चांगल्या सुविधा देणाऱ्या पॉलिसीज मिळतात त्या पाहू..
शून्य टक्के घसारा
या प्रकारातील विमा योजनेत एखाद्या पादचाऱ्याला गाडीचा धक्का लागलाच त्याला कमीत कमी इजा व्हावी, तसेच गाडीचे वजन कमी करून इंधनाची बचत व्हावी यासाठी आता प्लास्टिक आणि फायबरचे पार्ट्स जास्त वापरले जातात. अपघातप्रसंगी ते पूर्णपणे निकामीही होतात. साधारण विमायोजनेत या पार्ट्सची नुकसानभरपाई ही मूळ किमतीच्या ५०% च मिळते. परंतु शून्य टक्के घसारा प्रकारातील विमा योजना घेतल्यास वर उल्लेख केलेल्या पार्ट्सचीसुद्धा १००% नुकसानभरपाई मिळते. अशा प्रकारच्या विमा योजना गाडी घेतल्यापासूनच पाच वर्षांपर्यंत मिळू शकतात.
कन्झ्युमेबल सेक्युअर
अपघातामुळे गाडीचे इंजिन ऑइल, गिअर ऑइल, ब्रेक आणि पॉवरस्टिअिरगमध्ये वापरले जाणारे हायड्रॉलिक फ्लुइड, वातानुकूलन प्रणालीतील गॅस. रेडिएटरमधील कूलंट, एसी कॉम्प्रेसर, ऑइल, नटबोल्ट स्क्रू, ऑइल फिल्टचर, बेअिरग्ज, क्लिप्स या सर्व गोष्टींची नुकसानभरपाई या प्रकारात मिळू शकते. याबरोबरच इंजिन सेक्युअर आणि टायर सेक्युअर या योजनाही उपलब्ध आहेत.
आणीबाणी प्रसंगी
या पद्धतीच्या सुविधेमध्ये अपघातामुळे गाडी नादुरुस्त  झाल्यास विमाधारकाच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी भाडय़ाची गाडी वापरल्यास अथवा अपघातामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहावे लागल्यास गाडीचे भाडे अथवा एक दिवसाचे हॉटेलचे बिल विमा कंपनीकडून मिळू शकते. मात्र, त्यासाठी योग्य बिले विमा कंपनीला सादर करणे बंधनकारक आहे. टॅक्सी भाडे किंवा हॉटेलचे पसे याची भरपाई म्हणून मिळणारी रक्कम ही प्रत्येक विमा कंपनीची वेगळी असू शकते.
की रिप्लेसमेंट
नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या गाडय़ांमध्ये आता इग्निशन कीचे स्वरूप बदलत असून त्यामागे इलेक्ट्रॉनिक कोड आणि रिमोटसारख्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थातच त्यामुळे चावी हरवल्यास किंवा तुटल्यास, चोरीला गेल्यास नवीन चावी बनवण्यासाठी आणि स्कॅनरद्वारे त्याचे री-कोिडग करण्यासाठी की रिप्लेसमेंट सुविधेद्वारे नवीन चावी बनवण्याच्या ५०% पर्यंतचा खर्च विमा कंपनीकडून मिळू शकतो.
नो क्लेम बोनस
विमाधारकाने एक वर्षांच्या विमा योजनेच्या निर्धारित वेळेत कोणताही स्वरूपाचा दावा (क्लेम) न केल्यास प्रति वर्षी नो क्लेम बोनस वाढत जातो. तो ५०% पर्यंत वाढू शकतो. गाडी विकते वेळी आपल्या पॉलिसीवरती नोंद केलेला नो क्लेम बोनस आपल्याला आपल्या नवीन गाडीवरती (विमा कंपनी बदलली तरी) वापरता येतो. मात्र जुनी गाडी दुसऱ्या व्यक्तीचे नावे झाल्याचा कागदोपत्री पुरावा विमा कंपनीस / नवीन गाडी घेताना दाखवणे आवश्यक असते. प्रसंगी नो क्लेम बोनस आधीची गाडी विकल्यानंतर पुढील तीन वर्षांपर्यंत (एकदा) वापरता येतो.
पॉलिसी एक्स्प्रेस
कोणत्याही प्रकारच्या गाडीची नुकसानभरपाईचा दावा करताना १५०० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या इंजिन असलेल्या गाडय़ांना रुपये १००० व १५०० सीसीहून अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या गाडय़ांना रुपये २००० हे विमाधारकाने भरणे अनिवार्य असते. मिळणाऱ्या विम्याच्या रकमेतून ते वजा केले जातात.
रिटर्न ऑफ इन्व्हॉइस
या प्रकारच्या सुविधेमध्ये गाडीसाठी भरलेला एकरकमी कर आपल्याला विम्याने सुरक्षित करता येतो. एकरकमी कर हा १५ वर्षांसाठी वैध असतो. त्याच्या आकारणीसाठी सरकारी निकष खालीलप्रमाणे..
* पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या  ९%
* डिझेल इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ११%
* सीएनजी. इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ५%
एखाद्या दुर्दैवी प्रसंगात जसे की खूप मोठा अपघात, वाहनांची चोरी, दंगल किंवा आगीत कार भस्मसात होणे (समाजकंटकांद्वारे उभ्या असणाऱ्या वाहनांना आग लावण्याचे कृत्य सध्या वाढीस लागल्याचे आपण पाहतच आहोत) गाडीचे पूर्ण नुकसान झाल्यास एकरकमी कराची रक्कम भरपाई म्हणून परत मिळते.
WhatsApp

टर्म इन्शुरन्स चे फायदे

👭👭👭👭👨‍👩‍👧👨‍👩‍👧👭👭👭

*टर्म इन्शुरन्स चे फायदे*

👇👇👇👇👇👇👇👇👇

*⏩ मनसोक्त जगा करण आपल्यानंतर कुटुंबाची काळजी करण्याची आवश्यकता नाही.*

*⏩ कमी प्रीमियम मध्ये मोठे कव्हर मिळते*

*⏩ आपण काढलेले कर्ज आणि मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची गरजच नाही.*

*⏩ पॉलिसाच्या पुर्ततेनंतर कोणतीही रक्कम मिळत नसली तरी आपल्या कुटुंबला  मोठा आधार मिळण्याची शास्वती मात्र मिळतेच.*

⏩ *आपल्या कोणत्याही प्रकारच्या मृत्यूनंतर ( अपवाद ड्रिंक अँड ड्राईव्ह व दहशतवादी कारवाईत सहभागी) जेवढे कव्हर घेतले ती सर्व रक्कम कुटुंबियास मिळते.*

⏩ *इनकम टॅक्स मध्ये सूट मिळते*

⏩ ⏩⏩⏩⏩⏩⏩⏩

*HEALTH AND TERM POLICY SERVICES..*



👨‍👩‍👧👨‍👩‍👧👭👭👭👭👭👪👪

WhatsApp

टर्म प्लॅन घेताना घ्यावयाची काळजी

टर्म प्लॅन घेताना घ्यावयाची काळजी ⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩



  •  टर्म प्लॅन जेवढ्या लवकर घेऊ तेवढं आपल्या फायद्याचं आहे.



  •  सर्वोत्तम प्लॅन साठी महितीगार व्यक्तीशी किंवा एजंट शी सल्लामसलत करा.



  • 🙍‍♂किमान आपल्या वयाच्या 60 वर्षापर्यंतचा तरी प्लॅन  घ्यावा तोपर्यंत आपली मुलं कमावती झालेली असतील.



  • 📝 अँप्लिकेशन फॉर्म स्वतः भरा व जे काही असेल ते सत्य माहिती भरा( ड्रिंक किंवा स्मोकिंग करत असाल तर तसा उल्लेख करा) म्हणजे भविष्यात क्लेम ला अडचण येणार नाही.



  • 💊 टर्म प्लॅन घेताना प्रत्येकाचे मेडिकल चेकअप  कंपनीकडून मोफत केले जाते त्याला नकार देऊ नका. त्या पॉलिसीत आपला सत्य मेडिकल डेटा येऊ द्या तो आपल्याच फायद्याचा असतो.


👨‍👩‍👧टर्म प्लॅन घेतल्याचा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कल्पना द्या


⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩


अधिक माहितीसाठी फक्त वॉट्सअप करा आपले वय

HEALTH & TERM POLICY SERVICES..
संपर्क 📱8805868810

👭👭👭👭👭👨‍👩‍👧👨‍👩‍👧👭👭


  • 💊 टर्म प्लॅन घेताना प्रत्येकाचे मेडिकल चेकअप  कंपनीकडून मोफत केले जाते त्याला नकार देऊ नका. त्या पॉलिसीत आपला सत्य मेडिकल डेटा येऊ द्या तो आपल्याच फायद्याचा असतो.



  • 👨‍👩‍👧टर्म प्लॅन घेतल्याचा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कल्पना द्या



⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩

माझ्या सर्व आप्तेष्ठांच्या हितासाठी


👨‍👩‍👧👨‍👩‍👧👭👭👭👭👨‍👩‍👧👨‍👩‍👧


=====####======####=======####=======
WhatsApp

टर्म पॉलिसी कोणती घ्यावी ?

WhatsApp